मुंबई

जल विद्युत व तरंगता सौरउर्जा प्रकल्पाचा खर्च वाढला

CD

तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाचा खर्च वाढला
१० कोटींवरून २२ कोटींवर; आजच्या बैठकीत प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय अर्थात मध्य वैतरणा प्रकल्पात जल विद्युत प्रकल्प व तरंगता सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ऊर्जा वहन व्यवस्थेच्या मार्गाधिकार, भूसंपादनसाठी आणि काही बदल करून कालावधी वाढविण्यात आल्याने कंत्राटदाराला यापूर्वी देय असलेल्या १० कोटी रुपयांच्या खर्चात आणखीन १२ कोटींची वाढ झाल्याने याचा खर्च २२ कोटींवर गेला आहे. दरम्यान, उद्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबईची अतिरिक्त पाण्याची तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेने २५ वर्षांपूर्वी मध्य वैतरणा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकल्पासाठी विविध परवानग्या घेण्यातच ११ वर्षे गेली आणि तीन वर्षे प्रकल्पाच्या बांधकामात गेली. अखेर १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईला ४५५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले. या धरण प्रकल्पाच्या अंतर्गत ऊर्जानिर्मिती आणि सौरऊर्जानिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, महापालिकेने धरण प्रकल्प पूर्ण झाल्यावर धरणाच्या पाणीसाठ्यात तरंगता सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गतवर्षापासून पालिकेने तरंगता सौरऊर्जा प्रकल्प राबवला. त्यानुसार सौरऊर्जानिर्मितीला प्रारंभदेखील केला.

खर्चात मोठी बचत
सौरऊर्जेचा उपयोग तेथील आवश्यक विजेची गरज भागविण्यासाठी सध्या करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या यापूर्वीचा विजेच्या वापरासाठी होत असलेल्या लाखो रुपयांच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. भविष्यातही पालिकेला या सौरऊर्जा आणि विद्युत ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचा लाभ होणार आहे. मात्र, या दोन्ही प्रकल्प खर्चात १२ कोटींची वाढ झाल्याने प्रकल्प खर्च २२ कोटींवर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT