मुंबई

कोकण रेल्वे दुपदरीकरणाला गती; २६३ किमी मार्गासाठी डीपीआर प्रक्रिया सुरू

CD

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला गती
खासदार वायकर यांच्या प्रश्नावर केंद्राचे उत्तर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा मुद्दा आता प्रत्यक्ष हालचालींच्या टप्प्यात पोहोचला आहे. सुमारे २६३ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
खासदार रवींद्र वायकर यांनी १० फेब्रुवारी २०२६ला लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी लेखी उत्तर देताना कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मार्ग क्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले. रोहा (जि. रायगड) ते ठोकूर (कर्नाटक) असा सुमारे ७४० किलोमीटर लांबीचा कोकण रेल्वे मार्ग सध्या एकेरी आहे. वाढत्या प्रवासी व मालवाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे दुपदरीकरण अत्यावश्यक मानले जात आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने काम हाती घेण्याचा विचार असून, पहिल्या टप्प्यात २६३ किलोमीटरच्या मार्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या एकूण ७४० मार्ग किलोमीटरपैकी रोहा-वीर आणि मडगाव-माजोर्डा या विभागांदरम्यान सुमारे ५५ किलोमीटरचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित सुमारे ६८५ किलोमीटर मार्गावर क्षमता वाढीसाठी दुपदरीकरण आवश्यक असल्याचे रेल्वेने नमूद केले आहे.
...
समन्वय प्रक्रिया सुरू
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये केंद्र सरकारची ६६.३५ टक्के, महाराष्ट्राची १५.११ टक्के, कर्नाटकची १०.३० टक्के, तर गोवा व केरळची प्रत्येकी ४.१२ टक्के भागीदारी आहे. दुपदरीकरणासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चात सर्व भागधारक राज्यांनी आपल्या हिस्स्यानुसार सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. यासाठी संबंधित राज्य सरकारांशी समन्वय साधण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक अपेक्षित असून, त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे पूर्ण दुपदरीकरण हा दीर्घकालीन पण महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT