गुजरात चोरी प्रकरणाचा भिवंडीत छडा
दोन आरोपींना अटक; १७.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडी, ता. १४ (बातमीदार) : गुजरातमध्ये घडलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी भिवंडीतील शांतीनगर परिसरात लपून बसले होते. चोरीचा लाखो रुपयांचा मुद्देमाल, तसेच गुन्ह्यात वापरलेले ‘बोलेरो पिकअप’ वाहन या दोन्ही आरोपींकडून जप्त करण्यात आले असून, त्यानंतर त्यांना गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अहमदाबाद ग्रामीण जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुमारे ४४.४७ लाख रुपये किमतीची ‘रजनीगंधा’, तंबाखू आणि ‘गुटखा’ चोरीला गेला होता. या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुजरात पोलिसांचे एक पथक भिवंडीत दाखल झाले होते. शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी गुजरात पोलिसांशी समन्वय साधत भिवंडीत सलग दोन दिवस कसून शोधमोहीम राबवली. एका गोपनीय खबरीच्या आधारे पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या आरोपींची नावे अख्तर अली रहमत अली शेख आणि मोहम्मद अनस हकीम खान अशी असून, पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान, या दोन्ही आरोपींनी चोरीच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याचे कबूल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.