मुंबई

तलाकच्या वादातून सुनेवर हल्ला

CD

तलाकच्या वादातून सुनेवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : तलाकच्या वादातून कौटुंबिक बैठकीदरम्यान संतप्त सासऱ्याकडून सुनेवर आणि तिच्या भावावर पोलिस ठाण्याबाहेरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना कल्याणमधील वालधुनी परिसरात घडली. चाकू आणि दगडाने झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, मुख्य आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर भागात राहणाऱ्या रुक्सार हिचा पती तन्वीर खान याच्यासोबत तलाकच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. यासंदर्भात दोन्ही कुटुंबीयांची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र बैठकीदरम्यान वाद चिघळून रुक्सारला मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर रुक्सार आणि तिचा भाऊ अस्लम हे तक्रार नोंदवण्यासाठी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गेले. याच वेळी पोलिस ठाण्याबाहेरच आरोपींनी त्यांच्यावर चाकू आणि दगडाने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत रुक्सार आणि अस्लम यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत स्वतःचा जीव वाचवला. या घटनेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर मीरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महात्मा फुले पोलिसांनी तातडीने कारवाई करीत मुख्य आरोपी तन्वीर खान याला अटक केली आहे. सध्या सासरा आणि दीर फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT