मुंबई

आर्थिक फायद्यासाठी ड्रग्जला प्रोत्साहन!

CD

आर्थिक फायद्यासाठी ड्रग्जला प्रोत्साहन!
तपासणी न केल्याचा आयोजकांवर आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांचे सेवन होऊ शकते, याची पूर्वकल्पना असूनही सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्याची जबाबदारी आयोजकांवर होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आयोजक आकाश समळ उर्फ विहान (इन्स्पेयरिंग टाय), बालकृष्णन कुरुप (नेस्कोचे उपाध्यक्ष), सनी जैन (नेस्को) यांनी स्वतःचा आर्थिक फायदा पाहून कोणतीही झाडाझडती न घेता विद्यार्थ्यांना मुक्त प्रवेश दिला आणि अमली पदार्थ सेवनास प्रोत्साहन दिले, अशी माहिती वनराई पोलिसांनी न्यायालयाला दिली.
आयोजकांनी उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाची परवानगी घेतली खरी; मात्र २५ वर्षांखालील तरुणांना मद्य उपलब्ध करून देत मनाई आदेशाचा भंग केला. पोलिस प्रशासनाकडून या कॉन्सर्टसाठी रात्री १० पर्यंत परवानगी दिली होती. प्रत्यक्षात कार्यक्रम मध्यरात्री १२.३० पर्यंत सुरू ठेवण्यात आला. आयोजकांव्यतिरिक्त विद्यार्थी रौनक खंडेलवाल, प्रतीक पांडे आणि अमली पदार्थ विक्रेता आनंद पटेल यांच्यावर एक्स्टॅसीच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप आहे. रौनक, प्रतीक, शीतल, श्रेया आणि भसीन हे दक्षिण मुंबईतील नामांकित महाविद्यालयात एमबीए शिकत होते. रौनकने दक्षिण मुंबईतील निवासस्थानी आनंदकडून एक्स्टॅसीच्या गोळ्या मागवून घेतल्या. नेस्को केंद्रात शिरताच त्या इतरांना वाटल्या. आनंद हा कल्याणच्या खडकपाडा परिसरात राहतो. तो बांधकाम व्यावसायिक आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिस तपासात आहेत. शिवाय त्याने रौनकला किती प्रमाणात ड्रग्ज विकले, ते कोठून मिळवले, अन्य कोणाला विकले का, याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.
---
‘ते’ २० जणही चौकशीच्या फेऱ्यात
मृत श्रेया, भसीन आणि बचावलेल्या शीतलसोबत सुमारे २० अन्य तरुणांचा समूह कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. वनराई पोलिस या गुन्ह्याच्या अनुषंगाने या सर्वांची चौकशी करणार आहेत.
--
पोर्टरद्वारे डिलिव्हरी
आनंद पटेल याने पोर्टर सेवेद्वारे एक्स्टॅसीच्या गोळ्या रौनकपर्यंत पोहोचवल्या, अशी माहिती आरोपीच्या चौकशीतून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
----
काय आहे एक्स्टॅसी?
एमडीएमए अर्थात मेथाएम्फेटामाईन हे रासायनिक मिश्रण एक्स्टॅसी या नावे प्रसिद्ध आहे. या अमली पदार्थाच्या सेवनाने व्यक्ती पाच ते सहा तास नशेत राहतो. त्यामुळे यास पार्टी ड्रग म्हणूनही ओळखले जाते. ऊर्जा वाढवणे, जवळीक वाढल्यासारखा आभास होणे, संगीत आणि प्रकाश अधिक तीव्रतेने जाणवणे, आदी परिणाम जाणवतात. परंतु शरीराचे तापमान वाढणे, तोंड कोरडे पडणे, स्मरणशक्ती तसेच विचार करण्याची क्षमता कमी होणे, मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्यापर्यंत दुष्परिणाम संभवतात. अतिसेवन केल्यास मृत्यू होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT