मुंबई

‘वारीला सुट्टी नाही’ लघुपटाचा राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव

CD

‘वारीला सुट्टी नाही’ लघुपटाचा राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव
साक्षरतेचा संदेश देणाऱ्या लघुपटाला ११ हजारांचे पारितोषिक
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत आयआयएमटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, ग्रेटर नोएडा यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिसंवाद व ‘भारत फिल्म फेस्टिव्हल २.०’मध्ये इंदिरा गांधी महाविद्यालय निर्मित ‘वारीला सुट्टी नाही’ या लघुपटाला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पारितोषिक मिळाले.
या महोत्सवात देशभरातून आलेल्या १७० लघुपटांपैकी अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या १० लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) येथील इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या ‘कल्लाकार’ यूट्युब चॅनलमार्फत निर्मित ‘वारीला सुट्टी नाही’ या साक्षरतेचा संदेश देणाऱ्या लघुपटाने द्वितीय क्रमांक पटकावला.
या वेळी सुप्रिया शुक्ला आणि ‘पंचायत’ फेम अभिनेते चंदन रॉय यांच्या हस्ते ‘कल्लाकार’ चॅनलचे क्रिएटिव्ह हेड हार्दिक म्हात्रे यांना गौरवपत्र, मानचिन्ह आणि ११ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता म्हात्रे, विश्वस्त व प्राचार्य राजेंद्र म्हात्रे, खजिनदार डॉ. सुखदा चिराटे, विश्वस्त प्राचार्य मेघा म्हात्रे आणि डॉ. समृद्धी मोरे यांनी विद्यार्थी, शिक्षक व तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.

उरण तालुक्‍यामध्ये चित्रीकरण
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील आवरे येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयात या लघुपटाचे चित्रीकरण झाले. लघुपटाचे दिग्दर्शन सुयश म्हात्रे यांनी केले असून, संकल्पना मनोहर म्हात्रे व कैलास शेडगे यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT