मुंबई

मुंबईच्या किक बॉक्सर्सना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

CD

मुंबईच्या किक बॉक्सर्सना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
जोगळेकर वाडी येथे जिल्हास्तरीय निवड स्पर्धा उत्साहात
शिवडी, ता. १५ (बातमीदार) ः स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर आयोजित जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग निवड चाचणी सोमवारी (ता. १३) जोगळेकर वाडी, पालिका शाळा सायन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत पॉइंट फाइट, लाइट कॉन्टॅक्ट, किक लाइट, लो किक, फुल कॉन्टॅक्ट, के-वन तसेच म्युझिकल फॉर्म अशा विविध प्रकारांमध्ये खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या निवड स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे विजेते खेळाडू ८, ९ व १० मे २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
मुंबई शहरातील एस.एस.के.के.ए., एस.एच.एस.एम., ओ.एल.पी.एस., ओ.एल.जी.सी., पीवेसो, आरकेटु, महाराष्ट्र सेवा, जे. के. मार्शल आर्ट, हर्ष स्पोर्ट्स आणि बी.एम.टी.के. या विविध क्लब व युनिट्सनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. स्पर्धेचे नियोजन आणि पंचकार्य आंतरराष्ट्रीय रेफ्री विघ्नेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या वेळी सनिकेते साळसकर, आशीष महाडिक, भूपेश वैती, विंस पाटील, आफताब खान, सय्यद अफ्फान आणि साहिल बापेरकर यांनी पंच म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश मुरकर यांनी खेळाडूंना नियमित सराव, शिस्त आणि खेळाविषयी सखोल मार्गदर्शन केले.
मुंबई जिल्ह्यातील निवडक खेळाडू नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल, फुलगाव, पुणे येथे ८ ते १० मेदरम्यान होणाऱ्या वाको महाराष्ट्र अखिल महाराष्ट्र राज्य मुले, कॅडेट आणि ज्युनियर किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेमुळे मुंबई शहरात किक बॉक्सिंग या खेळाबद्दल आकर्षण वाढत असून, नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT