मुंबई

ओसवाल मार्गावर अतिक्रमणाचा विळखा कायम

CD

ओसवाल मार्गावर मनस्ताप
कारवाईनंतरही अतिक्रमणे ‘जैसे थे’
बोईसर, ता.१५ (वार्ताहर): बोईसरमधील ओसवाल मार्ग कामगार, प्रवासी, ग्राहकांसाठी वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. मात्र, येथील अतिक्रमणांमुळे मनस्ताप सोसावा लागत आहे.
ओसवाल परिसरातील व्यावसायिक इमारतींमुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होते. मात्र, पादचाऱ्यांसाठीच्या पदपथावर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. तर मुख्य रस्त्याच्या कडेला दुचाकींचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे.यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः स्टेशनकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कोंडीचा फटका बसत आहे.
-----------------------
प्रशासनाचे दुर्लक्ष
बोईसर पोलिस वाहतूक शाखा, ग्रामपंचायतीने संयुक्त कारवाई करून अनधिकृत पार्किंगवर दंडात्मक कारवाई केली होती. काही काळासाठी दिलासा मिळाला. मात्र, पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली असून प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील ५६ गुन्हे मागे; राज्य सरकारने पुन्हा मागविली पोलिसांकडून माहिती, जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हालचाली

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

SCROLL FOR NEXT