मुंबई

अनधिकृत शेडवर कारवाई सुरू

CD

अनधिकृत शेडवर पालिकेचा प्रहार
इंद्रलोक येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाची कारवाई
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : इंद्रलोक परिसरात झोपडपट्टीला लागलेल्या आगीत तीन जणांचा बळी गेला होता. या प्रकारानंतर पालिकेने बेकायदा शेड, गोदामे, मंडपावर कारवाई सुरू केली आहे.
इंद्रलोक परिसरात मोकळ्या जागेवरील झोपड्यांना लागलेल्या आगीत १५ वर्षीय दोन मुलांसह एकाचा होरपळून मृत्यू झाला. या जागेवर तिवरांची कत्तल करून मातीभरावावर बेकायदा झोपड्या बांधण्यात आला होत्या. मात्र, या प्रकाराकडे प्रभाग अधिकाऱ्यांनी डोळेझाक होती. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाच्या निष्काळजीवर संताप व्यक्त करताना शहरातील बेकायदा बांधकामांवर दोन दिवसांत कारवाई करा, असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी शहरातील अनधिकृत बांधकांचे सर्वेक्षण सोमवारपासून कारवाई सुरू केली आहे.
-------------------------
जाणीवपूर्वक डोळेझाक
मिरा रोड येथे एक फर्निचरच्या गोदामाला आग लागल्यानंतर प्रशासनाने अनधिकृत शेडवर कारवाई सुरू केली होती. मात्र, कारवाई झाल्यानंतर मोहीम थंडावली होती. प्रभाग अधिकाऱ्यांची अनधिकृत बांधकांमांकडे जाणीवपूर्वक होणारी डोळेझाक दुर्घटनेला कारणीभूत ठरली होती. अग्निशमन विभागाने शहारातील अनधिकृत शेड, मंडपांची यादीच प्रभाग अधिकाऱ्यांकडे देऊन कारवाई करण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, त्यानंतरही प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई केली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT