मुंबई

सांडपाणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

CD

रासायनिक सांडपाणी व्यवस्थापनात गोंधळ
तारापूर औद्योगिक क्षेत्रात चेंबरमध्ये अनधिकृत वाहिनी
बोईसर, ता. १५ (वार्ताहर) : औद्योगिक प्रक्रियेनंतरचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामधून (ईटीपी) प्रक्रिया करून अधिकृत चेंबरमध्ये सोडणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान काही चेंबरमध्ये थेट अनधिकृत पाइप टाकले आहेत. त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
प्लॉट क्रमांक ६/४ येथील चेंबरमध्ये पाइप आढळल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. या पाइपद्वारे नेमके कोणते द्रव सोडले जात आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने संशय अधिकच वाढला आहे. कोणत्या उद्योगांकडून हे पाइप टाकण्यात आले आहेत. त्यामागील उद्देश काय, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. या प्रकारामुळे सांडपाणी व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
----------------------
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्व एमआयडीसी चेंबरसाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. कारखान्यांमधून येणाऱ्या सर्व वाहिन्या दिसतील अशा पद्धतीनेच चेंबरमध्ये सोडणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक चेंबरला क्रमांक देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
-केतन पाटील, क्षेत्र अधिकारी, तारापूर

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT