मुंबई

लग्नाच्या सुवर्ण व रौप्य महोत्सव वर्ष साजरे

CD

लग्नाच्या सुवर्ण व रौप्य महोत्सवाचा जल्लोष
बँड पथक सुमधुर आवाजात दाम्पत्य मेळ्याव्यात

वसई, ता. १५ (बातमीदार) : कुटुंब सेवा समितीच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम नुकताच नालासोपाऱ्याच्या वाघोली येथील वेलंकनी माता चर्च येथे घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत लग्नाचा रौप्य व सुवर्ण महोत्सव गाठलेल्या दाम्पत्यांसाठी एका सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात अनेक दाम्पत्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. या सोहळ्यात तब्बल ५६ दाम्पत्यांनी सहभाग नोंदवला होता.

लग्नाच्या वेळी जशी वरात काढण्यात येते, तशीच काहीसी वरात नालासोपाऱ्यातील वाघोली येथे काढण्यात आली. बँड पथकाच्या तालावर वरातीत अनेक जणांनी ठेका घेतला होता. मात्र, ही वरात होती, लग्नाच्या रौप्य व सुवर्ण महोत्सव गाठणाऱ्या दाम्पत्यांची. पारंपरिक वेशभूषेत व सुमधूर संगीताच्या तालावर या मंडळींनी जेव्हा चर्चमध्ये प्रवेश केला, तेव्हा त्यांचा स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. कुटुंब माता सेवा समिती तर्फे धर्मगुरू फा. ज्यो आल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा लग्नाचा रौप्य व सुवर्ण महोत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. या वेळी अनेक वर्षे एकमेकांसोबत सुखासमाधानाने आयुष्य घालवणाऱ्या या सुंदर जोडप्यांचा सत्कारही पार पडला. या वेळी फा. आल्मेडा व सहाय्यक धर्मगुरू फा. आग्नेलो करवाल यांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दैनंदिन जीवनात सुख-दुःखात एकमेकांना साथ देणाऱ्या या दाम्पत्यांनी आपल्या लग्नाचे रोप्य व सुवर्ण महोत्सव गाठले आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली असेल. यातील असे अनेक दाम्पत्य होते की, त्यांना गोड असे नातवंडही आहेत. या नातवंडांनीही आपल्या आजी-आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस नाचत-गाजत साजरा केला. या वेळी प्रत्येक सोहळ्याचे मानकरी असलेल्या प्रत्येक दाम्पत्याच्या तोंडावर सुखाचे क्षण होते. अनेक वर्षे एकमेकांसोबत घालवलेल्या प्रत्येक आठवणी त्यांना यावेळी नक्कीच आठवल्या असतील.

या वेळी या दाम्पत्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी चर्चमध्ये एक छोटेखानी कार्यक्रमही पार पडला. सिसिलिया डिसूझा यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. फा. ज्यो आल्मेडा यांनी प्रास्ताविक मांडली. तसेच सुखी संसारात एकमेकांसोबत वावरताना कशाप्रकारे हित जपावे याचे मार्गदर्शन फा. करवालोनी यांनी केले. यावेळी सायनम रॉड्रिग्ज व सुनीता रोझारिया यांनी महोत्सवाची मानकरी असलेल्या संगीता रोमन फर्नांडिस व लुईजा फ्रँक डिसोजा यांच्याशी संवाद साधला. या वेळी जुली डाबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. वेरोणिका डिब्रिटो यांनी सुत्रसंचालन केले. या वेळी उपस्थितांनी बँड पथकाच्या तालावर मनसोक्त नाचण्याच्या आनंद घेतला. या सुंदर नियोजनाबाबत सर्व दाम्पत्यांनी कुटुंब समितीचे आभार मानत, सोहळ्याची सांगता केली.
------
वसई : लग्नाचा सुवर्ण व रौप्य महोत्सव गाठणाऱ्या दाम्पत्यांसाठी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT