मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती बोईसर शहरात अभूतपूर्व जल्लोषात साजरी

CD

बोईसरमध्ये भीम जयंतीचा अभूतपूर्व जल्लोष
अनुयायांची उत्स्फूर्त गर्दी, जयघोषाने परिसर दुमदुमला

बोईसर, ता. १५ (वार्ताहर) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पहाटेपासूनच बोईसर शहरातील विविध भागांमध्ये भीम अनुयायांची उत्स्फूर्त गर्दी उसळली होती.

डॉ. आंबेडकरांच्या पुतळे आणि प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. दुपारनंतर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर दणाणून सोडले. ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला असून, निळ्या पताका, आकर्षक रथ, ढोल-ताशांचा गजर आणि सामाजिक संदेश देणारे फलक हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. यंदा बोईसरमध्ये अक्षरशः भीमसागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. तरुणाईसह महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. विविध ठिकाणी खीर, पाणी व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले.

कडक पोलिस बंदोबस्त आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला. एकूणच बोईसरमधील ही जयंती केवळ उत्सव न ठरता सामाजिक एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारी ठरली.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Crime: मांजर-बोक्याचं झेंगाट; ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

SCROLL FOR NEXT