मुंबई

धामणी–शेलवास राज्य मार्गावरील मोरी पूल धोकादायक

CD

मोरी पूल धोकादायक
धामणी-शेलवास राज्य मार्गावरील अपघातांची भीती

कासा, ता. १५ (बातमीदार) : पाली-विक्रमगड-तलवाडा-धामणी मार्गे शेलवास असा सुमारे ४५ किलोमीटरचा राज्य मार्ग तयार करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणच्या अनेक मोऱ्यांची (लहान पूल) दुरुस्ती व सुधारणा न झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः धामणीजवळील भावरपाडा येथील मोरी पूल अत्यंत धोकादायक ठरत असून, येथे वारंवार अपघात घडत असल्याचे चित्र आहे.

या मार्गावरून धामणीमार्गे पुढे शेलवासकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, आवरपाडा परिसरातील मोरी पूल अरुंद, तीव्र वळणाचा आणि उतारावर असल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होतो. अनेक वेळा दुचाकी तसेच चारचाकी वाहने पुलावर नियंत्रण गमावून घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वाहने पुलाच्या बाजूला जाऊन अडकली असून, अपघातांची संख्या वाढत आहे. मागील वर्षी गवत वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक तीव्र वळणामुळे या पुलावरून बाजूला उलटल्याची घटना घडली होती. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झालेली नसली, तरी मोठा अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिक धोकादायक ठरते. प्रकाशयोजना, इशारा फलक आणि सुरक्षाव्यवस्था नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रघुवीर भोगाडे यांनी सांगितले की, हा मार्ग अनेक गावांसाठी जवळचा आणि महत्त्वाचा असून, दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, धोकादायक वळण, अरुंद पूल आणि खराब स्थितीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे. बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून सूचनाफलक, सुरक्षा भिंती आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात. दरम्यान, संबंधित विभागाने या मार्गावरील जुने पूल व मोऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT