मुंबई

माथेरान घाटात बिबट्याचे दर्शन

CD

माथेरान घाटात बिबट्याचे दर्शन
टॅक्सी चालकाने केला व्हिडिओ, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
कर्जत, ता. १५ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (ता. १४) रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास माथेरान-नेरळ घाटमार्गावर बिबट्या दिसून आला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
टॅक्सी चालक महेंद्र जाबरे हे माथेरानहून नेरळकडे जात असताना दस्तुरीजवळील चांगभले मंदिराच्या वळणावर त्यांना बिबट्या दिसला. महेंद्र यांनी प्रसंगावधान राखत मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केला असून, तो सामाजिक माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माथेरानच्या खोऱ्यात मोठे जंगल असल्याने याठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर अधूनमधून दिसून येतो.

वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, तसेच जंगल परिसरात अनावश्यक वावर करू नये, असेही सूचित करण्यात आले आहे. माथेरान घाट परिसरात यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT