खारघरमध्ये वाहतूक कोंडीला आळा
८० वाहनांवर पोलिसांची कारवाई
खारघर, ता. १५ (बातमीदार) : खारघरमधील गोखले शाळेकडून शिल्प चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता गेल्या काही दिवसांपासून सतत कोंडीच्या विळख्यात सापडत होता. ही कोंडी फोडण्यासाठी खारघर वाहतूक पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेकायदा पार्किंगमुळे रस्ता व्यापणाऱ्या तब्बल ८० वाहनांवर पोलिसांनी ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली असून, काही वाहने थेट उचलून नेण्यात आली आहेत.
खारघर वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी भरत थिटे गोखले शाळेकडून शिल्प चौकाकडे जाणारा रस्ता हा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून, शाळा, निवासी वसाहती आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनचालक बेकायदा पार्किंग करत असल्याने कोंडी होत होती. यामुळे पादचाऱ्यांना आणि शालेय विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत खारघर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली. यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे ८० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्यात आली.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, अशा मोहिमा नियमितपणे राबवाव्यात, अशी मागणी केली आहे. रस्त्यावर उभी असलेली वाहने ही मोठी समस्या बनली होती, तर वाहतूक विभागाने वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काळातही अशा प्रकारची कारवाई सुरू ठेवली जाणार असल्याचे भरत थिटे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.