मुंबई

कॅन्सर तपासणीसाठी गरिबांचे खिसे रिकामेच;

CD

कर्करोग तपासणीसाठी गरिबांचे खिसे रिकामेच
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याची मागणी
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : राज्यातील ग्रामीण भागातून मोठ्या आशेने मुंबईत येणाऱ्या कर्करोग संशयित रुग्णांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ प्राथमिक तपासण्यांसाठीच १८ ते २० हजार रुपये मोजावे लागत असल्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचे उपचार निदानाअभावीच रखडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कर्करोगाच्या सर्व प्राथमिक तपासण्या विनाशुल्क करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद अग्निहोत्री यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील रुग्ण उपचारांसाठी मुंबईतील मोठ्या सरकारी रुग्णालयांकडे धाव घेतात. मात्र, तिथे गेल्यावर रक्ताच्या चाचण्या, स्कॅनिंग आणि बायोप्सी यांसारख्या प्राथमिक निदानासाठीच हजारो रुपयांची मागणी केली जाते. हातावर पोट असलेल्या रुग्णांना हा खर्च पेलवणारा नसल्याने, अनेक रुग्ण अर्धवट तपासणी सोडून गावी परत जातात. या तपासण्या सुरुवातीलाच मोफत केल्या, तर कर्करोगासारख्या आजाराला वेळीच अटकाव घालणे शक्य आहे. प्रसाद अग्निहोत्री यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून मार्च २०२३ मध्ये याबाबत मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी तत्कालीन आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याला दोन वर्ष उलटूनही अद्याप त्यावर शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

उपमुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांकडे निवेदन
अग्निहोत्री यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. तसेच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कॅन्सर निदानाच्या सर्व चाचण्यांचा समावेश करावा, शासकीय रुग्णालयांत येणाऱ्या संशयित रुग्णांची विनामूल्य तपासणी व्हावी, निदान आणि उपचार यामधील वेळेची तफावत कमी करण्यासाठी तातडीने निर्देश द्यावेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनात केल्या आहेत.

कर्करोगचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाले, तर रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य आहे. मात्र, केवळ पैशांअभावी तपासण्या रखडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. कर्करोगसारख्या आजारात वेळ अत्यंत महत्त्वाची असते. शासकीय स्तरावर या तपासण्या मोफत झाल्या, तर हजारो रुग्णांना वेळीच उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील.
- प्रसाद अग्निहोत्री, अध्यक्ष, संवेदना रुग्णसेवा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

SCROLL FOR NEXT