मुंबई

वरसोली पूल २० वर्षांपासून वापराविना

CD

जोडरस्त्याअभावी कोट्यवधींचा प्रकल्प ठप्प; बांधकाम विभागाने रस्ताच केला रद्द
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : वरसोली खाडीवरील पूल उभारून तब्बल २० वर्षे उलटली तरी जोडरस्त्याअभावी हा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प आजही वापराविना ठप्प आहे. किनारपट्टीवरील वरसोली आणि थळ परिसरातील नागरिकांना दळणवळण सुलभ व्हावे तसेच पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, या उद्देशाने हा पूल उभारण्यात आला होता. मात्र नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प अपूर्णच राहिला आहे.
पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी दोन्ही बाजूंना आवश्यक असलेले अ‍ॅप्रोच रस्तेच तयार झाले नाहीत. परिणामी पुलावरून नियमित वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. मागील दोन दशकांत अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी बदलले, मात्र जोडरस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन करण्यात प्रशासन अपयशी ठरले. दरम्यान, प्रस्तावित रस्त्याच्या जागेवर नागरिकांनी घरे बांधल्याने आता जागाच उपलब्ध नाही.
या पुलामुळे कोळीवाडे, किनारी भाग आणि अलिबाग शहर यांच्यात थेट संपर्क निर्माण होणार होता. मासळी वाहतूक जलद होईल, पर्यटन वाढेल आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र सध्या नागरिकांना लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने वेळ, इंधन आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
चौकट
भूसंपादनाचा अडथळा
कोकणात भूसंपादन करणे अत्यंत कठीण असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. योग्य वेळी जमीन संपादन न झाल्याने संपूर्ण प्रकल्पच अडचणीत आला असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
चौकट
मार्ग अखेर रद्द
जोडरस्त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर हा मार्गच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल निरुपयोगी ठरला असून, स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
----
सार्वजनिक निधीतून उभारलेला हा प्रकल्प दीर्घकाळ वापराविना राहणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. योग्य वेळी निर्णय घेतल्यास हा पूल परिसराच्या विकासाला नवी दिशा देऊ शकला असता. शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
- मिलिंद कवळे, माजी सरपंच, वरसोली ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

SCROLL FOR NEXT