मुंबई

रोह्यातील तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

CD

रोह्यातील तीन बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश
एका प्रकरणी गुन्हा दाखल
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) ः बालविवाह या प्रथेला आळा घालण्यासाठी रोहा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. यापैकी एका गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेत गायचोळे आदिवासीवाडी येथे १६ मार्च रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह त्याच वाडीतील २० वर्षीय तरुणासोबत होणार होता. यासंदर्भात पोलिस मंगल टेमकर यांना लग्नपत्रिकेसह गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ प्रभारी अधिकारी मारुती पाटील यांना कळवले. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधित कुटुंबीयांना ताब्यात घेऊन बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत कायद्याची माहिती देत त्यांचे समुपदेशन केले.
दुसऱ्या प्रकरणात, मे २०२६ मध्ये गायचोळे आदिवासीवाडीतील १७ वर्षीय मुलीचा विवाह कोलाड येथील २० वर्षीय तरुणासोबत ठरवण्यात आला होता. याबाबत बीट अंमलदार नरेश मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रभारी अधिकारी सुयशकुमार सिंह यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक, ग्रामसेवक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधितांना समज देण्यात आली.
तर, भुवनेश्वर आदिवासीवाडी येथे २८ जून २०२५ रोजी बालविवाह असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांना समज देण्यात आली होती, परंतु त्यानंतरही विवाहाची तयारी सुरूच होती. यादरम्यान हळदी समारंभात पोलिसांनी छापा टाकला असता १६ वर्षीय मुलीशी संबंधित तरुणाने संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबंधित मुलगा व दोन्ही कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोषारोपपत्रदेखील न्यायालयात सादर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT