मुंबई

पनवेल बाजारपेठ फुलली

CD

पनवेल बाजारपेठ फुलली
अक्षय तृतीया व लग्नहंगामाचा उत्साह ः कडक उन्हातही खरेदीसाठी गर्दी
पनवेल ता. १५ (बातमीदार) ः आगामी अक्षय तृतीया, लग्नसराईचा हंगाम, संकष्टी चतुर्थी आणि रविवारची सुट्टी यांचा योग जुळून आल्याने पनवेलच्या मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. कडक उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही नागरिकांची बाजारपेठेत अक्षरशः झुंबड उडाली.
शहरातील शिवाजी चौक, टिळक रोड, मिरची गल्ली आदी भागांमध्ये दिवसभर ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली. सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची पावले वळू लागली होती. रंगीबेरंगी वस्तूंनी सजलेली दुकाने, विक्रेत्यांची लगबग आणि ग्राहकांचा उत्साह यामुळे संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः टिळक रोडवरील गल्ल्यांमध्ये साड्या, दागिने, पूजेचे साहित्य आणि घरगुती वस्तूंच्या दुकानांपुढे महिलांची मोठी गर्दी झाली होती. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासह बस्ता खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची लगबग लक्षवेधी ठरली. पारंपरिक रुखवत सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंना मोठी मागणी असून, आकर्षक भांडी, हस्तकला साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि उखाण्यांच्या पुस्तकांची विक्री वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

वाहतूक संथ गतीने
वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी लिंबूपाणी, उसाचा रस आणि आईस्क्रीमच्या गाड्यांकडेही मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीमुळे परिसरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती. परिणामी, काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती. पोलिस आणि वाहतूक विभागाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले.

अक्षय तृतीया आणि लग्नसराईमुळे यंदा साड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः पारंपरिक आणि डिझायनर साड्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ग्राहकांची गर्दी वाढत असून, प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार चांगल्या दर्जाच्या साड्या निवडताना दिसत आहे. सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर बाजारात उत्साहाचे वातावरण असून आमच्या व्यवसायालाही त्याचा मोठा फायदा होत आहे.
- निखिल सोनी, श्री दीपक साडी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT