मुंबई

एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा

CD

मदतीच्या बहाण्याने फसवणुकीचा भांडाफोड
एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा
भाईंदर, ता. १५ (बातमीदार) : मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा काशीगाव पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी अटक केली असून, अन्य आरोपीला लवकरच अटक केली जाणार आहे.
मिरा रोड येथील हटकेश भागातील एटीएम केंद्रात ४ एप्रिलला सुप्रिया चौहान पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवून एटीएममधून पैसे येत नाहीत, असा बनाव केला. तसेच शिताफीने एटीएम कार्डची अदलाबदल करत चौहान यांच्या खात्यातून ७४,५०० रुपये काढून घेतले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शंभरहून अधिक सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यानंतर आरोपी दीपक इंद्रभूषण ऊर्फ बिपीन झाला याला डोंबिवलीतून रविवारी (ता. १२) अटक केली. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ५० हजार रुपये रोख तसेच वेगवेगळ्या बँकांची सहा एटीएम कार्ड हस्तगत केले आहेत.
------------------
दोघांवर ८५ गुन्हे
मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात तसेच उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशामधील चित्रपूर जिल्ह्यात जवळपास ६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तर त्याचा साथीदार किस्मत शेखवर २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे. दोघेही लहान मुले, वयोवृद्ध नागरीक, महिला यांना लक्ष्य करत असतात, अशी माहिती उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT