मुंबई

उल्हासनगरमध्ये अल्पदरात अत्याधुनिक तपासण्या

CD

उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : धीरज कुमार आयलानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उल्हासनगरमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधेची भर पडली आहे. ‘चार साहिबजादे एमआरआय व सीटी स्कॅन सेंटर’चे मंगळवारी उद्‍घाटन करण्यात आले. सेंट्रल हॉस्पिटल परिसरातील अरुणकुमार वैद्य सभागृह (टाऊन हॉल) येथे हा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. आमदार कुमार आयलानी यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राचे उद्‍घाटन पूज्य मधुसूदन महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रशासकीय, राजकीय आणि विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. या सुविधेमुळे शहरातील रुग्णांना केवळ १८०० रुपयांत एमआरआय, तर हजार रुपयांत सीटी स्कॅनची सेवा उपलब्ध होणार आहे. याशिवाय रक्त तपासण्यांवर ४० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत आणि स्वस्त दरात औषधांचीही सुविधा देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, आरजू धीरज आयलानी, बिंदिया आयलानी, आयुक्त मनीषा आव्हाळे, महापौर अश्विनी निकम, पोलिस उपायुक्त सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच ‘चार साहिबजादे ट्रस्ट’चे अध्यक्ष सरदार गुरविंदर सिंह बावा, डॉ. हरमीत सिंह सलूजा आणि विविध शैक्षणिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

Pune Water Cuts: खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला; पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

Health Workers: राज्यात ४,१९३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या, समुपदेशनाद्वारे प्रक्रिया

Baramati News : उपमुख्यमंत्र्यांची शासकीय वैदयकीय महाविद्यालयात सरप्राईज व्हिजिट आणि प्रशासनाची पळापळ....

Mumbai Strike: टँकर चालकांचा संप, बेस्टचाही आंदोलनाचा इशारा, उष्णतेचा तडाखा... मुंबईकरांवर ट्रिपल संकट; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT