मुंबई

वधू बनून नवरदेवाला लुबाडले

CD

नवरदेवाच्या दागिण्यांवर वधुचा डल्ला
मिरारोड येथील घटना, महिलेसह दोघांना अटक
भाईंदर, ता.१५ (बातमीदार): वधू बनून नवरदेवाच्या घरातील सोन्याचांदीचे दागिने, किंमती ऐवज चोरल्याची घटना मिरारोड येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली.
मिरा रोड येथे राहाणारे सेवलकुमार नाडर यांना लग्न करायचे होते. त्याची माहिती काढून केसरीमल रांकाने नाडर यांना लग्नाकरीता मुलगी असल्याचे सांगून महिलेची छायाचित्रे पाठवली. त्यानंतर लग्न लावून देण्याकरीता नाडर यांच्याकडून विविध बँकेच्या खात्यावर ४४ हजार ७५० रुपये घेण्यात आले. तसेच लग्नानंतर घरातील ४ लाख ७६ हजारांचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप चोरला होता. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील महिला आरोपी नेहा खंडेलवाल ऊर्फ जन्नत, केसरीमल रांका यांना सोमवारी (ता.१३) अटक केली. या दोघांवर संगमनेर, अहिल्यानगर, मुंबईतील जोगेश्वरी, बोरीवली, जळगाव येथील पाचोरा येथे अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT