मुंबई

पनवेल लोकसभा मतदारसंघाची शक्यता

CD

पनवेल लोकसभा मतदारसंघाची शक्यता!
२०२९च्या पुनर्रचनेमुळे उत्तर रायगडच्या राजकारणात मोठा बदल?

उत्तर रायगडमध्ये राजकीय भूकंपाचे संकेत
२०२९मध्ये स्वतंत्र पनवेल लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येणार?

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल ता. १५ (बातमीदार) ः २०२९मध्ये होणाऱ्या या पुनर्रचनेकडे संपूर्ण राज्यासह उत्तर रायगड जिल्ह्याचे विशेष लक्ष लागले आहे. गेल्या दशकात झालेली प्रचंड लोकसंख्या वाढ, विमानतळ प्रकल्प आणि नागरीकरण यामुळे पनवेल लोकसभा हा नवा मतदारसंघ अस्तित्वात येण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे. या संभाव्य बदलामुळे स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणात बदल होऊ शकतो. त्याचबरोबर राजकीय समीकरणेसुद्धा बदलू शकतात.
पनवेल आणि परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला असता, गेल्या काही वर्षांत येथे लोकसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येते. मुंबईजवळील उपनगर म्हणून पनवेलची ओळख झपाट्याने बदलत असून, येथे मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे पनवेल ग्रामीण आणि पनवेल शहर असे दोन स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.
याचबरोबर उरण, खालापूर आणि कर्जत या तालुक्यांमध्येही नागरीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. औद्योगिक विकास, नवीन रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि रोजगाराच्या संधी यामुळे या भागात स्थलांतर वाढले असून, लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील विद्यमान मतदारसंघांचे विभाजन किंवा नव्याने पुनर्रचना होणे अपेक्षित आहे.
उत्तर रायगडच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रकल्पांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रमुख प्रकल्प आहे. या विमानतळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि नागरी विकासाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर नैना प्रकल्पांतर्गत एज्यु सिटी, एरो सिटी, मेडिसिटी यांसारख्या संकल्पनात्मक शहरांची उभारणी सुरू आहे. पुष्पकनगरसारख्या नव्या वसाहतींचा विकास आणि विविध गृहनिर्माण प्रकल्पांमुळे या भागाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलत आहे. महामार्ग, रेल्वे आणि इतर वाहतूक सुविधांमुळे पनवेल आणि आसपासचे भाग अधिक सुलभ झाले आहेत. या सर्व घटकांचा विचार करता, आगामी जनगणनेनंतर पनवेल आणि आसपासच्या भागातील लोकसंख्या लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असलेल्या निकषांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे स्वतंत्र पनवेल लोकसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. यासोबतच विधानसभा मतदारसंघांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत २०२९ मधील मतदारसंघ पुनर्रचना ही उत्तर रायगडसाठी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

मावळ पॅटर्नचा फेरविचार होणार?
२००९मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रायगड आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ एकत्र करून मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या वेगळा ठरला. कारण घाटाखालील आणि घाटावरील भागांचा समावेश यात करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विविध भौगोलिक अडचणींना सामोरे जावे लागले. आता २०२९मध्ये होणाऱ्या नव्या पुनर्रचनेत या रचनेचा फेरविचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महिलांना ३३ टक्के आरक्षण
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होणार असल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल अपेक्षित आहेत. काही मतदारसंघ महिला उमेदवारांसाठी राखीव होणार असल्याने पारंपरिक राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील मतदारसंघांवरही याचा परिणाम होणार असून, नवीन नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT