मुंबई

क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाला राजशिष्टाचार भंगाचे गालबोट

CD

राजशिष्टाचार भंगाचे गालबोट
क्रीडा संकुलाच्या उद्‍घाटनावरून मंत्री सरनाईक यांची मुख्य सचिवांकडे तक्रार
भाईंदर, ता. १५ (बातमीदार): मिरा भाईंदर महापालिकेच्या भाईंदर पश्चिम येथे बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाचे बुधवारी (ता. १५) आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. मात्र या उद्‍घाटन कार्यक्रमानिमित्त महापालिका प्रशासनाकडून राजशिष्टाचाराचे पालन करण्यात आले नसल्याची तक्रार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. त्यामुळे प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महापालिकेने भाईंदर पश्चिम भागात जैनाचार्य विजय अभयदेव सूरीश्वराजी क्रीडा संकुल व सभागृह ही वास्तू उभारली आहे. या वास्तूचे उद्‍घाटन बुधवारी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त महापालिकेने निमंत्रण पत्रिका छापली. यावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या पत्रिकेत सर्वात वर नरेंद्र मेहता यांचे नाव उद्‍घाटक म्हणून छापण्यात आले आहे. त्याखाली अध्यक्ष म्हणून महापौर डिंपल मेहता आणि त्याखाली मुख्य अतिथी म्हणून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव छापण्यात आले आहे. यावर सरनाईक यांनी आक्षेप घेतला आहे.
राजाशिष्टाचार हा राज्यातील सर्वच महापालिकांना एकसारखाच लागू असून, मिरा भाईंदसाठी वेगळा नाही. मंत्री असतानाही आपले नाव आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाच्या खाली छापण्यात आले, हा राजाशिष्टाचारांचा भंग आहे. यासंदर्भात आपण राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

लवकरच तरण तलावाचे बांधकाम
भाईंदर पश्चिम भागात महापालिकेचे क्रीडा संकुल सुरू झाल्याने खेळाडूंसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. महापालिकेने सुमारे ४२ कोटी रुपये खर्च करून साडेतीन हजार चौ. मीटर क्षेत्रफळाची इमारत उभी केली आहे. इमारतीच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर प्रशस्त सभागृह आहे. तर दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, व्यायामशाळा, पूल, स्नूकर, बॅडमिंटन, क्रिकेट प्रशिक्षण, पिकल बॉल अशा क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. या संकुलाच्या आवारातील मोकळ्या जागेत लवकरच तरण तलावदेखील बांधण्यात येणार आहे, अशी माहिती उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी दिली.
-------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT