मुंबई

पालिका शाळांतील विद्यार्थिनींची ‘कोडअव्हर’ स्पर्धेत चमक

CD

पालिका शाळांतील विद्यार्थिनींची ‘कोडअव्हर’ स्पर्धेत चमक
इंडोनेशियात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
जुईनगर, ता. १५ : नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शहराचा गौरव वाढवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या इंडोनेशिया येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. १५, शिरवणे येथील इयत्ता आठवीतील शिफा असलम अन्सारी हिने बेंगळुरू येथे आयोजित ‘कोडअव्हर’ या राष्ट्रीय स्पर्धेत ‘एआयच्या सहाय्याने स्तन कर्करोग निदान’ हा अभिनव प्रकल्प सादर केला. तिच्या प्रकल्पाला परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली असून तिने तृतीय क्रमांक पटकावला. शिफाला वर्गशिक्षिका परविन बानू अकबर शेख तसेच मुख्याध्यापिका रंजना साळी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ३१, कोपरखैरणे येथील इयत्ता सातवीतील जानवी गायकवाड आणि श्रेया कांबळे यांनीही ‘कोडअव्हर’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना वर्गशिक्षिका अंजली महेश पितळे व ज्योती संजय दिघे यांचे मार्गदर्शन लाभले, तर मुख्याध्यापिका रुपाली रमाकांत गावंड यांचे नेतृत्व लाभले.
या सर्व विद्यार्थिनींच्या यशामागे त्यांचा कठोर परिश्रम, जिद्द, नवोपक्रमाची दृष्टी आणि शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन, पालक आणि नवी मुंबईकरांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

SCROLL FOR NEXT