मुंबई

आयुक्तांकडून क्षेपणभूमीची पाहणी

CD

आयुक्तांकडून क्षेपणभूमीची पाहणी
विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा

विरार, ता. १५ (बातमीदार) : शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बुधवारी (ता. १५) भोयदापाडा येथील क्षेपणभूमीची पाहणी केली. या वेळी वसई येथील श्वान निर्बीजीकरण केंद्रालाही आयुक्तांनी भेट देऊन पाहणीदरम्यान संबंधित विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

आयुक्तांकडून सुरुवातीस घनकचरा विभागाच्या विविध यंत्रसामुग्री व वाहनांचीही पाहणी करण्यात आली. यामध्ये स्वीपिंग मशीन, जेट मशीन, व्हॅक्यूम मशीन, स्प्रिंकल मशीन इत्यादींचा समावेश होता. कचरा संकलन, वाहतूक व प्रक्रिया यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची स्थिती, देखभाल व कार्यक्षमता याबाबतदेखील सविस्तर आढावा घेण्यात आला. यंत्रसामुग्रीचा अधिक परिणामकारक वापर करून शहरातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच शहरातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी घनकचरा विभागामार्फत वापरण्यात येणाऱ्या बीच क्लिनिंग मशीनच्या कार्याची आयुक्तांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर साचणारा कचरा, प्लॅस्टिक, शंख-शिंपले आणि इतर घनकचऱ्याचे यांत्रिक पद्धतीने संकलन कसे केले जाते, वाळूमधील सूक्ष्म कचरा कसा वेगळा केला जातो याची सविस्तर माहिती घेण्यात आली. या वेळी बीच क्लिनिंग मशीनच्या ऑपरेटरकडून प्रत्यक्ष कामाची माहिती घेण्यात आली. तसेच कामकाज अधिक सुरळीत व परिणामकारक होण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचविण्यात आल्या. स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक समुद्रकिनारे नागरिकांना उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.

यानंतर आयुक्तांनी वसई, नवघर पूर्व येथील महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. श्वान निर्बीजीकरण केंद्रात सुरू असलेल्या कार्यपद्धतीची पाहणी करताना भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच यामध्ये अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना संबंधितांना देण्यात आल्या. त्यांतर भोयदापाडा येथील क्षेपणभूमीला भेट देत पाहणी केली. त्यांनी या वेळी क्षेपणभूमीवर कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत तपशीलवार माहिती घेतली. तसेच कचऱ्याचे ढीग योग्य प्रकारे हाताळणे, दुर्गंधी व प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे, आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक दक्षता बाळगणे याबाबत स्पष्ट सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला. आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबतच क्षेपणभूमीवरील ठेकेदाराशीही संवाद साधत कामकाजातील त्रुटींबाबत स्पष्ट निर्देश दिले. कामाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी तसेच वेळेत व नियमांनुसार काम पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यास सांगितले. यंत्रसामुग्रीचा योग्य वापर, मनुष्यबळाचे नियोजन व नियमित देखरेख यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप-आयुक्त अर्चना दिवे, उप-आयुक्त हर्षला राणे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक तसेच स्वच्छता निरीक्षक, घनकचरा विभागाचे कर्मचारी, अभियंते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

IAS Officers Transfers: महाराष्ट्रात पुन्हा मोठी प्रशासकीय उलथापालथ! ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ, कोण कुठे गेलं?

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: इस्लामाबादमधील तिढ्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तेहरानमध्ये दाखल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

SCROLL FOR NEXT