‘आम्ही लोक’ महोत्सवात सामाजिक-सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव
फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त पुस्तक मेळावा
खारघर, ता. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे ‘एक शहर-एक संघ-एक मंच’ या संकल्पनेतून ‘वी दी पीपल-आम्ही भारताचे लोक’ हा महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी महात्मा जोतिबा फुले यांच्या २००व्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले.
महोत्सवात तीन दिवस मोफत पुस्तक मेळावा भरविण्यात आला असून, सुमारे दोन हजारांहून अधिक पुस्तकांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. सामाजिक जनजागृतीसाठी आयोजित परिसंवादात प्रदीप ढोबळे, गौरव सर्जेराव आणि ॲड. सविता मोराळे यांनी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यूट्युबर नेहा ठोंबरे यांनी वऱ्हाडी शैलीतून सामाजिक संदेश दिला.
युवकांसाठी व्यंगचित्र आणि चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विविध राज्यांच्या लोकनृत्यांनी सांस्कृतिक वैविध्य खुलले. अमोल मोहिते यांच्या ‘धम्मसंध्या’ आणि गायिका मोनल कडलक यांच्या भीमगीतांनी कार्यक्रम रंगतदार झाला. विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलनीही आकर्षण वाढवले.
‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गीतातून एकतेचा संदेश देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.