ठाण्याच्या आरआरएसएची दमदार कामगिरी
सर्व जलतरणपटू वर्ल्ड फायनलसाठी पात्र
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमी (आरआरएसएची)ने ओशनमॅन, क्रॅबी (थायलंड) येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत ठाण्याचा आणि देशाचा मान उंचावला. जगभरातील स्पर्धकांच्या सहभागात अकॅडमीच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट सहनशक्ती, शिस्त आणि स्पर्धात्मकता दाखवत विविध गटांमध्ये पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेतील सर्वात अभिमानाची बाब म्हणजे अकॅडमीतील सर्व जलतरणपटूंनी ओशनमॅन वर्ल्ड फायनल चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. ही अंतिम स्पर्धा नोव्हेंबर २०२६ मध्ये डॉमिनीकन रिपब्लिक येथे होणार असून, भारतीय जलतरणासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. स्पर्धेतील १० किमी ज्युनियर गटात स्वरा सावंत (महिला) व अक्षथ सिद्धेश सावंत (पुरुष) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पाच किमी गटात हस्ती किशोर धर्मशी (द्वितीय), आर्या मकरंद तांबोळी (तृतीय) आणि तनय लाड (तृतीय) यांनी चमकदार कामगिरी केली. दोन किमी गटात तनय लाडने प्रथम, आरव आहुजाने द्वितीय, तर श्री सुनिलकुमार शेट्टीने महिला गटात तृतीय स्थान मिळवले. ५०० मीटर स्पर्धेत श्री शेट्टीने प्रथम क्रमांक मिळवला, तर अंडर-१३ गटात तनय लाड, आरव आहुजा आणि अभीर साळसकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान पटकावत क्लीन स्वीप साधला.
हे सर्व खेळाडू ठाणे येथील रामचंद्र ठाकूर स्विमिंग पूल व डोंबिवलीतील पलावा ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर येथे नियमित सराव करतात. या यशामागे अकॅडमीचे दर्जेदार प्रशिक्षण व खेळाडूंचे समर्पण महत्त्वाचे ठरले आहे.
सागरकन्या रुपाली रेपाळे
अकॅडमीच्या संस्थापिका रुपाली रेपाळे या स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम जलतरणपटू असून, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. १९९५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा पुरस्कार, १९९९ मध्ये तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार, तसेच एचआयएमए फाउंडेशन पुरस्कार त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘सागरकन्या’ ही पदवी बहाल केली असून, न्यूझीलंड सरकारने ‘डॉल्फिन क्वीन’ हा किताब देऊन सन्मानित केले आहे. रुपाली रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरआरएसए सातत्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू घडवत असून, भारतीय जलतरण क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.