मुंबई

बीकेसीत महाकाय क्रेन कोसळली

CD

बीकेसीत महाकाय क्रेन कोसळली
मेट्रो स्थानकाच्या कामादरम्यान दुर्घटना; मुख्य रस्ता १२ तास ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अंधेरी (पश्चिम)-मंडाळे या मेट्रो-२ ‘बी’च्या मार्गिकेवरील स्थानकाचे वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) काम सुरू आहे. या स्थानकात प्री-कास्टेड बीम बसवताना मंगळवारी मध्यरात्री एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शनजवळ तांत्रिक बिघाडामुळे महाकाय क्रेन कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी क्रेन आणि बीम सायंकाळपर्यंत हटवण्याचे काम सुरू होते. यामुळे वांद्रे-कुर्ला स्थानकाला जोणारा मुख्य रस्ता १२ तासांहून अधिक काळ बंद झाल्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांची दिवसभर काेंडी झाली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडी) मेट्रो-२ ‘बी’ची उभारणी सुरू आहे. त्याअंतर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील पॅकेजचे काम कंत्राटदार जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीमार्फत सुरू आहे. या कामादरम्यान प्री-कास्ट बीम दोन क्रेनच्या मदतीने उचलताना एका क्रेनमध्ये तांत्रिक बिघाड हाेऊन सुमारे ४०० टन वजनाची मोबाईल क्रेन कलंडून अर्ध्यावर उचललेला बीम रस्त्यावर कोसळला. या दुर्घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तसेच पर्यायी मार्गामुळे डायमंड मार्केटसह परिसरात जाणाऱ्यांना पायपीट करावी लागली.

वाहतूक कोंडी
कोसळलेली क्रेन आणि बीम हटवण्यासाठी एमएमआरडीएने तत्काळ ६०० टन क्षमतेची क्रेन तैनात केली. त्यामुळे दुपारपर्यंत काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी अपेक्षा होती; मात्र सायंकाळपर्यंत काम सुरूच होते. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक वळवण्यात आल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

एक कोटीचा दंड
कामात निष्काळजी केल्याचा ठपका ठेवून एमएमआरडीएकडून कंत्राटदार जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चरला एक कोटी रुपयांचा प्राथमिक दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT