मुंबई

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात स्वाक्षरी अभियान

CD

उल्हासनगर, ता. १५ (बातमीदार) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात उल्हासनगरात स्वराज्य संघटनेच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या उपक्रमाला १४ एप्रिलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रस्ताव पुढे आणल्याचा आरोप करत, हा निर्णय एससी-एसटी समाजातील एकजूट खंडित करणारा असल्याची भूमिका संघटनेने मांडली. जाती-जातींमध्ये भेद निर्माण करून समाजात फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख ॲड. जय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले. आम्हाला उपवर्गीकरण मान्य नाही, हा संदेश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपली भूमिका नोंदवली. सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी उपवर्गीकरणाला विरोध करण्याची भूमिका नागरिकांनी स्पष्टपणे मांडल्याचे या अभियानातून दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT