मुंबई

सिडकोतर्फे विमानतळाच्या तिसऱ्या धावपट्टीसाठी सल्लागार नियुक्त

CD

तिसऱ्या धावपट्टीसाठी सल्लागार नियुक्त
सिडकोतर्फे विमानतळाचा तांत्रिक अभ्यास करणार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे तिसऱ्या धावपट्टीच्या विकासासाठी सिडकोतर्फे सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी सिडकोने राईट्स लिमिटेड आणि क्रिएटीव्ह ग्रुप एलएलपी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. हा अभ्यास सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना प्रमुख राष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून करण्यात आली आहे. पूर्ण क्षमतेनंतर दरवर्षी ९० दशलक्ष (एमपीपीए) प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता यामध्ये विकसित केली जात आहे. सुमारे १,१६० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या विमानतळात एकाच वेळी स्वतंत्रपणे कार्यरत राहू शकतील अशा दोन समांतर धावपट्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, पुढील १० वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित होणारी चार टर्मिनल्सही प्रस्तावित आहेत.
वाढवण येथे तिसऱ्या विमानतळाचा प्रस्ताव असला तरी, संभाव्य वाढत्या मागणीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सिडकोकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराच्या पर्यायांचाही सक्रियपणे अभ्यास केला जात आहे. राईट्स लिमिटेड ही रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखालील ‘नवरत्न’ आणि अनुसूची ‘अ’ दर्जाची केंद्र सरकारी सार्वजनिक उपक्रम संस्था आहे. वाहतूक व पायाभूत सुविधा क्षेत्रातील बहुआयामी सल्लागार म्हणून तिची ख्याती आहे. प्रस्तावित व्यवहार्यता अभ्यासामध्ये तिसऱ्या धावपट्टीच्या विकासाची तांत्रिक, कार्यकारी, पर्यावरणीय आणि आर्थिक व्यवहार्यता सर्वंकषपणे तपासली जाणार आहे.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यता अभ्यासाबाबत महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीस गीता पिल्लई, सीजीएम (टीअँडए), सिडको; बिंदू मुरलीधरन, अतिरिक्त मुख्य परिवहन अभियंता, सिडको; अनिल असवानी, महाव्यवस्थापक, विमानतळ विभाग, राइट्स लिमिटेड; तसेच गुरप्रीत सिंग शाह, व्यवस्थापकीय संचालक, क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी उपस्थित होते.
————————————————
राईट्स-क्रिएटिव्ह ग्रुप यांची सल्लागार म्हणून नियुक्ती ही सिडकोच्या दूरदृष्टीपूर्ण आणि भविष्याभिमुख पायाभूत विकासाच्या दृष्टिकोनाचे द्योतक आहे. प्रस्तावित तिसरी धावपट्टी ही क्षमतावाढ, कार्यक्षमता वृद्धी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी निर्णायक ठरेल.
-विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT