मुंबई

एसआरएच्या कार्यालयाचा विस्तार होणार

CD

एसआरए कार्यालयाचा होणार विस्तार
एचडीआयएल इमारतीत ४० कोटींना मजला खरेदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) वांद्रे पूर्व येथील एचडीआयएल टाॅवरमध्ये तब्बल ४० कोटी रुपयांना एक मजला खरेदी करणार आहे. सुमारे १४ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या जागेत लवकरच एसआरएच्या कार्यालयाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे एसआरएला सध्या मोजावे लागत असलेल्या भाड्याची बचत होणार आहे.
वांद्रे पूर्व येथे एसआरए प्राधिकरणाचे मुख्यालय असले तरी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे एसआरएने शेजारीच असलेल्या एचडीआयएल इमारतीत तिसरा मजला भाड्याने घेतला असून, त्यामध्ये जवळपास १२ उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्याशी संबंधित अधिकारी-कर्मचारी बसतात. त्याकरिता सुमारे ३० लाख रुपये भाडे महिन्याला मोजावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर एसआरएने पिरामल ग्रुपकडून ४० कोटी रुपयांना सहावा मजला विकत घेतला असून, त्याबाबतचा करार नुकताच झाला असल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT