एनएमएमटी बसची कारला धडक
नवी मुंबई : वाशी येथील अरेंजा सर्कलवर बुधवारी एनएमएमटी बस आणि कारचा अपघात झाला. सिग्नल चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
यात कारचालक ठाकूर हे जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कार आणि बस दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार कोपरी गाव येथून पाम बीच मार्गाने वाशीच्या दिशेने येत होती, तर एनएमएमटी बस वाशी डेपोतून तुर्भे मार्गे उरणच्या दिशेने जात होती. अरेंजा सर्कल येथे दोन्ही वाहने एकाच वेळी आल्याने आणि सिग्नल नियमांचे उल्लंघन झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमी चालकाला उपचारासाठी पाठवले. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.