खर्चाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी
पालिकेतील विरोधकांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ ः प्रशासकीय राजवट असताना मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या चार वर्षांत केलेल्या खर्चाचा तपशील नगरसेवकांना दिला जात नाही. प्रशासनाने केलेला वारेमाप खर्च जनतेसमोर यावा, यासाठी त्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी जोरदार मागणी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पालिका सभागृहात अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या वेळी केली.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या चर्चेला आज आपल्या भाषणाने सुरुवात केली. त्या म्हणाल्या की, देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका असा पालिकेचा लौकिक आहे. जकात हा पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा आणि मुख्य स्रोत गेल्याने मालमत्ता कराच्या उत्पन्नावर समाधान मानावे लागत आहे. पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत दररोज कमी होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कराच्या उत्पन्नात यावर्षी मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात प्रशासनाने वारेमाप खर्च केला आहे. तो खर्च मिळविण्यासाठी नगरसेवकांनी माहिती अधिकाराचा आधार घ्यायचा काय, असा सवालही त्यांनी केला.
...
ठेवीही खर्च केल्या!
पालिकेने ज्या विविध बॅंकांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत, त्या ठेवींमधील काही रक्कम गेल्या तीन वर्षांपासून प्रशासन काढीत असून, विकासकामांसाठी वापरीत आहेत. यापुढे महापालिकेच्या ठेवींवरील रक्कम काढण्यात येऊ नये. या ठेवी कोणकोणत्या बॅंकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत आणि किती मुदतीसाठी ठेवण्यात आल्या आहेत, याबाबतचा तपशीलही श्वेतपत्रिकेत स्पष्ट होईल, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.