कापूरबावडीतील गोदामात अवैध गॅस सिलिंडर साठा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : कापूरबावडी परिसरातील एका गोदामात सुमारे १०० ते १२५ अवैधरीत्या गॅस सिलिंडर साठवण्यात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या गॅस सिलिंडरचे दर वाढलेले असल्याने काळाबाजार करण्याच्या उद्देशाने हा साठा करण्यात आला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्याला याची माहिती मिळाली होती. तसेच चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या निदर्शनास हे आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पथक पाठवून गोदामाची पडताळणी केली. संबंधित ठिकाणी साठवलेले सिलिंडर कायदेशीर आहेत की अवैध, याची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती रेशनिंग विभागालाही देण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.