मुंबई

exclusive news प्रवाशांसाठी खुशखबर; खर्डी-कसारा तिसरी मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत

CD

खर्डी-कसारा तिसरी मार्गिका लवकरच सेवेत
१२ मेपासून वीजपुरवठा सुरू; वाहतूक गतिमान होणार
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक गतिमान होणार आहे. या मार्गावरील तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार असून, खर्डी ते कसाऱ्यादरम्यान १३ किलोमीटरच्या टप्प्यातील ओव्हरहेड वायरचे काम पूर्ण झाले आहे. येत्या १२ मेपासून या ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या पट्ट्यातील लोकल तसेच मेल-एक्स्प्रेसची वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार आहे.
आसनगाव ते कसारादरम्यान या प्रकल्पाचा पहिला टप्पा राबवण्यात येत आहे. त्यातील खर्डी-कसारादरम्यान ओव्हरहेड वायरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रणाली इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसाठी सज्ज झाली असून, वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर चाचण्या सुरू होणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणेही शक्य होणार असून, विशेषतः कसारा-कल्याण दिशेने अधिक गाड्या उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
----
गर्दीवेळी अधिक लोकल  
प्रवाशांच्या दृष्टीने तिसऱ्या मार्गिकेमुळे अधिक लोकल सुरू झाल्याने गाड्यांचा विलंब कमी होणे, गर्दीचे विभाजन होऊन प्रवास अधिक स्थिर होईल. सध्या एकाच मार्गिकेवर असलेला ताण कमी होऊन लोकल सेवांची कार्यक्षमता वाढणार आहे. मालवाहतूक आणि उपनगरीय सेवांमध्ये समतोल राखणेही सोपे होणार आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यावर गर्दीवेळी अधिक लोकल चालवणे तुलनेने सुलभ ठरेल.
---
प्रकल्पाबाबत थोडक्यात
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका
लांबी : ६७ किमी
पहिला टप्पा : आसनगाव ते कसारा
महत्त्वाचा भाग : खर्डी ते कसारा ओएचईचे काम पूर्ण
पुढील टप्पा : १२ मेपासून वीजपुरवठा सुरू
....
खर्डी-कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरील ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू होणार आहे. उच्च दाबाचा वीजप्रवाह सुरू होणार असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेची दक्षता घ्यावी.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT