प्रस्तावित सहकार धोरण
सर्वसमावेशक करणार!
मुंबई, ता. १५ : राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रस्तावित सहकार धोरण सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करणारे व विश्वासार्ह असेल, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
मुंबई येथील राज्य सहकारी बँकेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या सहकार धोरणातील बदलांच्या अनुषंगाने गठित उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या वेळी पणनमंत्री जयकुमार रावल, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत सहकार क्षेत्राच्या विविध विभागांशी संबंधित विषयांवर सादरीकरण करण्यात आले आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.