मुंबई

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानची ‘रामकथा बोध’ स्पर्धा

CD

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानची ‘रामकथा बोध’ स्पर्धा
१० लाख लोकांना जोडण्याचा संकल्प

मालाड, ता. १६ (बातमीदार) ः ‘प्रत्येक घरात रामायण - प्रत्येक व्यक्तीमध्ये रामायण’ या संकल्पनेतून बोरिवलीतील संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे देशव्यापी ऑनलाइन ‘रामकथा बोध’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. इस्कॉन, चिन्मय मिशन आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार असून, सुमारे १० लाख लोकांना या उपक्रमाशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रतिष्ठानच्या समन्वयक नम्रता पुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले गेले असले तरी देशात ‘रामराज्य’ स्थापनेसाठी प्रत्येकाच्या हृदयात रामाचे विचार रुजवणे आवश्यक आहेत. याच उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या चार भाषांमध्ये उपलब्ध असून, वयाची कोणतीही अट नाही. १९ एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत कोणत्याही सोयीस्कर दिवशी ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. परीक्षेचा कालावधी २० मिनिटांचा असून ३० प्रश्न विचारले जाणार आहेत.
स्पर्धेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच प्रत्येक शहरातील पहिल्या १०० स्पर्धकांना श्रीरामलल्लाची छोटी मूर्ती आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्रसाद भेट म्हणून दिला जाणार आहे. स्पर्धकांच्या तयारीसाठी प्रश्नोत्तर स्वरूपात अभ्यास साहित्यही उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी www.sanskrutisamvardhan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : विषारी दारु प्रकरणात १५ मृत्यू, सीआयडीची माहिती

SCROLL FOR NEXT