मुंबई

शालेय प्रवासात जीवाची बाजी

CD

शालेय प्रवासात जीवाची बाजी
नियमबाह्य वाहतुकीमुळे अपघातांचा धोका
कासा, ता. १६ (बातमीदार)ः तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास नियमबाह्य वाहनांच्या वापराने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी विविध वाहनांचा वापर करत असले तरी सुरक्षिततेच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
व्यस्त जीवनशैलीमुळे पालकांना पाल्यांना शाळेत स्वतः सोडणे शक्य होत नाही. त्यामुळे शालेय बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. मात्र, वाहनांचे मासिक शुल्क परवडत नसल्याने पालक अन्य वाहनांचा पर्याय निवडतात. परिणामी, क्षमतेपेक्षा अधिक गर्दीत, चेंगराचेंगरीच्या परिस्थितीत जीव मुठीत धरून चिमुकल्यांना प्रवास करावा लागत आहे. अनेक चालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेफिकीरपणे विद्यार्थ्यांची ने-आण करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
--------------------------------
परीक्षेचा कालावधी सुरू
कासा ते डहाणू मार्गावर तसेच परिसरातील विविध रस्त्यांवर अशा प्रकारचा धोकादायक प्रवास सर्रास पाहायला मिळत आहे. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू असून, उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वेळेत शाळेत पोहोचणे आवश्यक असल्याने अशा अनधिकृत वाहनांचा वापर वाढला आहे.
-------------------------
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी, अनधिकृत वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलली तर अनेक अपघात टाळता येतील.
- श्रावण गावित, सदस्य, ज्येष्ठ निवृत्त संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT