मुंबई

राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात राज्यात प्रथम

CD

तंत्र प्रदर्शनात वाणगाव सरस
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा राज्यात दुसरा क्रमांक
वाणगाव, ता. १६ (बातमीदार)ः राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रात वाणगावच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांनी राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात डिपेक्समध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुंबईतील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कौशल्य मंत्री लोढा यांच्या हस्ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नावीन्यता विभागाच्यावतीने स्पर्धेचा पुरस्कार वितरण करण्यात आले. पद्मश्री जिव्या सोमा मशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) वाणगाव संस्थेला डिपेक्स प्रतिष्ठित तंत्र प्रदर्शन स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामीण भागात कार्यरत पद्मश्री जिव्या सोमा मशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव यांनी साधनसामग्री, भौगोलिक अडचणी असून, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, उद्योगाभिमुख उपक्रमातून राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
---------------------------------
आदर्शवत कामगिरी
ग्रामीण भागातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचे मोलाचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. या यशामुळे ग्रामीण भागातूनही उत्कृष्टतेकडे वाटचाल शक्य आहे, हा सकारात्मक संदेश राज्यभर पोहोचला आहे. तसेच इतर आयटीआय संस्थांसाठीही हा आदर्श ठरणार आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे आयटीआय वाणगावचा राज्यात ठसा उमटवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT