मुलुंड तहसील कार्यालयात नागरी सेतू सुविधा केंद्र सुरू
अत्याधुनिक केंद्रातून नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सेवा
मुलुंड, ता. १६ (बातमीदार) ः नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुलुंड तहसील कार्यालयात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नागरी सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन मंगळवारी (ता. १४) माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या हस्ते पार पडले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात संविधान स्तंभाला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली.
या वेळी बोलताना ॲड. आशीष शेलार यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे नागरिकांना समानतेचे आणि अधिकारांचे बळ मिळाले आहे. हे अधिकार नागरिकांपर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठीच बँक किंवा कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर हे आधुनिक सुविधा केंद्र उभारण्यात आले असून, नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा मिळणार आहेत.
या कार्यक्रमाला लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे, मुंबईचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुलुंडचे ज्येष्ठ नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, अविनाश कोष्टी, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगरे कल्पना गोडे, मुलुंडचे तहसीलदार दिलीप रायण्णावर, विनायक थविल आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.