मुंबई

प्रेशर अनियंत्रित, जीव धोक्यात

CD

ज्वलनशील रसायनाने कामगार भाजला
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घटना, प्रकृती चिंताजनक
बोईसर, ता. १६ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील नंडोलसा इंडस्ट्रीज येथील स्टीम ड्रायरमधील ज्वलनशील रसायन बाहेर पडून एक कामगार जखमी झाला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
बॉयलरचे झाकण उघडताच स्फोटसदृश प्रकार झाला. यात हरिश्चंद्र आंबेकर (वय ३२, रा. शिवाजी नगर, बोईसर) हा कामगार गंभीररीत्या भाजला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात प्रेशर कंट्रोल यंत्रणेत बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, तपास सुरू आहे.
दरम्यान, संबंधित उद्योगात औद्योगिक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, या घटनेमुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT