मुंबई

मुंब्र्यात पार्क रिक्षांवर झाड कोसळले; दोन रिक्षांचे नुकसान

CD

मुंब्र्यात रिक्षांवर झाड कोसळले
दोन रिक्षांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १६ : मुंब्रा परिसरातील बाबा पाटील वाडी येथे झाड कोसळून दोन रिक्षांचे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (ता. १६) सकाळी समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

मुंब्र्यातील गणपती विसर्जन घाटाजवळील परिसरात पार्क केलेल्या दोन रिक्षांवर अचानक झाड कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिक काशिनाथ सावंत यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. तत्काळ घटनास्थळी ठामपा अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेत. त्या जवानांनी तत्परतेने झाड कापून रस्त्याच्या एका बाजूला केले. या घटनेत राजेश यादव आणि राम किणे यांच्या मालकीच्या रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: बालेन शाहांवर दबाव वाढला, तरीही शांत; पण नेपाळ सरकारने सीमा वाद मिटवण्यासाठी उचललं पाऊल

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

पहिलीच मालिका गाजली तरीही छोट्या पडद्यावरून का गायब होती दीपा परब? स्वतः सांगितलं कारण, म्हणाली-

Salary System News: भारतीयांना आता महिन्यात दोन वेळा मिळणार पगार? कोणी दिला प्रस्ताव? कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता

INDW vs ENGW: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का; इंग्लंडमध्ये खेळताना 'या' एका चुकीमुळे टीम इंडियाने मालिका गमावली!

SCROLL FOR NEXT