

Will Indians Get Salary Twice a Month? Anupam Mittal’s Proposal Sparks Debate
esakal
नवी दिल्ली: दर १५ तारखेला पगाराचा अर्धा भाग खात्यात जमा झाला आणि महिन्याच्या शेवटी उर्वरित रक्कम मिळाली तर कसे वाटेल? या प्रश्नाने अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. शादी.कॉमचे संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे जज अनुपम मित्तल यांनी मासिक वेतन प्रणालीऐवजी द्विमासिक (बाय-मंथली) पगार व्यवस्था सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. लिंक्डइनवर त्यांनी केलेल्या पोस्टमुळे वेतन भुगतानाच्या पद्धतीवर देशभर चर्चा रंगली आहे.