मुंबई

श्रीवर्धन येथील नागरिकांनी " माॅब लिंचिंग "

CD

मॉब लिंचिंग टाळा
वाढत्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांचे आवाहन
श्रीवर्धन, ता. १६ (वार्ताहर) ः शहरात मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या चोऱ्यांच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी बुधवारी (ता. १५) नागरिकांशी संवाद साधत शांतता राखण्याचे आवाहन केले. संशयित व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता पोलिसांना कळवावे आणि मॉब लिंचिंगसारखे प्रकार टाळावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी या वेळी दिले.
या सभेत नागरिकांनी शहरात वाढलेली गुन्हेगारी, रात्रीच्या वेळी लोखंडी सळ्या व दगड मारून दहशत पसरवणारे चोरटे आणि परप्रांतीय फेरीवाल्यांची वाढती संख्या यावर आक्षेप नोंदवले. संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तींची पोलिसांनी कसून चौकशी करावी आणि त्यांच्या ओळखीचे पुरावे तपासावेत, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. यावर अभिजित शिवथरे यांनी ड्रोन कॅमेराबाबत विचाराधीन असून, गावात संशयित व्यक्ती दिसल्यास संपर्क साधा. अनेकदा संतापाच्या भरात संशयित व्यक्ती किंवा गुन्हेगारास जमावाकडून मारहाण केली जाते. यामध्ये संबंधित व्यक्तीचा मृत्यू ही होऊ शकतो. यामुळे अशा घटना टाळव्यात, असे आवाहन नागरिकांना केले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे, नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी मार्गदर्शन केले.

श्रीवर्धन नगर परिषद व पोलिस ठाणे यांच्यात समन्वयाचा अभाव
श्रीवर्धन नगर परिषदेकडून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याचे नियंत्रण पोलिस कंट्रोल रूममधून केले जाते, परंतु ९५ पैकी ९३ कॅमेरे सुस्थितीत असल्याचा खुलासा केला, तर उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे यांनी ९३ पैकी ५२ कॅमेरे सुरू असल्याचे सांगितले. यामुळे नगर परिषद आणि पोलिस ठाण्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.

(फोटो -
श्रीवर्धन ः अभिजित शिवथरे यांनी नागरिकांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT