मुंबई

उरण नगर परिषदेत भाजपचेच वर्चस्व

CD

उरण नगर परिषदेत भाजपचेच वर्चस्व
२४ पैकी २१ ठरावाना सर्वानुमते मंजुरी
उरण, ता. १६ (बातमीदार) ः उरण नगर परिषदेत नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे असले तरी, सत्तेची खरी चावी आजही भारतीय जनता पक्षाकडेच असल्याचे स्पष्ट झाले. नगर परिषदेच्या विशेष सभेत भाजपने मांडलेल्या २४ पैकी २१ ठरावांवर सर्वानुमते मंजुरीची मोहर उमटवण्यात आली. या निर्णयामुळे शहरातील विकासकामांवरील भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह नऊ जागा जिंकून भाजपला धक्का दिला होता. मात्र, २१ पैकी १२ जागांवर विजय मिळवून भाजपने सभागृहात आपले बहुमत कायम राखले आहे. यापूर्वी २७ मार्च रोजी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे १२ सदस्य अनुपस्थित राहिल्याने कोरमअभावी सभा तहकूब झाली होती. मात्र, नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी अर्ध्या तासानंतर ही सभा घेत २४ ठराव मंजूर करून घेतले होते. ही प्रक्रिया बेकायदा असल्याचा दावा करत भाजप गटनेते जयविंद्र कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत १५ एप्रिल रोजी तहसीलदार उद्धव कदम यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्याचे आदेश दिले. या सभेत शहराच्या विकासासंदर्भात भाजपच्या तब्बल २४ पैकी २१ ठरावांना सर्वानुमते मंजुरी दिली आहे. राहिलेले तीन ठरवाची दुरुस्ती करून तेही मंजूर केले जाणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष रवी भोईर यांनी दिले आहे.
शहरासाठी आमदार महेश बालदी यांनी कोट्यवधींचा निधी आणला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही भाजप उरण शहराचा कायापालट करण्यास कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास भाजप उरण शहराध्यक्ष कौशिक शहा यांनी व्यक्त केला आहे. या वेळी भाजप उपनगराध्यक्ष रवी भोईर, नगरसेविका सायली म्हात्रे, नगर सेवक जयविंद्र कोळी, गणेश पाटील, राजू ठाकूर, जसीम गॅस, रजनी कोळी, रिबेका मढवी, पूर्वा वैवडे, रोहित पाटील, सायली पाटेकर, दमयंती म्हात्रे यांनी आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hailstorm Strong Wind : पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित; आंबा-मोसंबी बागांचे नुकसान

Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

Pune FDA Raid : भेसळखोरांवर ‘एफडीए’ ची धाड; सत्‍तेचाळीस लाखांचा संशयित खवा, पनीर आणि तूप जप्त

Wagholi Fraud News : नोकरी देतो म्हणून दिवाळखोर कंपनीत नोकरी देऊन अनेकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक; दोन कंपन्यांच्या मालकासह संचालकांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update: माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांना २०० रुपये कांडे पेमेंट केले जाहीर

SCROLL FOR NEXT