मुंबई

एनएमएमटीतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

CD

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात (एनएमएमटी) ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरात अखेर वेतनवाढीचे दान पडले. परिवहन समितीच्या बैठकीत बुधवारी (ता. १५) झालेल्या चर्चेअंती, १,३९८ कर्मचाऱ्यांच्या मानधनात सात हजारांची सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महागाईने होरपळणाऱ्या चालक आणि वाहकांना दिलासा मिळणार असल्याने या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत होत आहे. या वेतनवाढीमुळे एनएमएमटी व पर्यायाने महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाकाठी कोट्यवधींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

परिवहन समितीच्या बैठकीत सदस्य राहुल शिंदे यांनी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये मानधनवाढीचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र प्रशासनाने एनएमएमटीच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा दाखला देत, इतका मोठा आर्थिक भार पेलणे कठीण असल्याचे सांगितले. यावर सदस्य आणि प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाली आणि अखेर मध्यममार्ग म्हणून सात हजारांच्या सरसकट वाढीवर सर्वांचे एकमत होऊन तो मंजूर करण्यात आला. या वेतनवाढीमुळे चालकांना आता ३२,५०० रुपये, तर वाहकांना ३१,५०० रुपये मानधन मिळणार आहे.

प्रशासनावर पडणार आर्थिक बोजा
या वेतनवाढीमुळे एनएमएमटी उपक्रमावर दरमहा सुमारे ९३ लाखांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आधीच तोट्यात असलेल्या परिवहन विभागाला ही तूट भरून काढण्यासाठी पालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे. एनएमएमटीची आर्थिक परिस्थिती पाहता, दरवर्षी पालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानावर परिवहन विभागाची मदार असते. गेल्या वर्षी एनएमएमटी उपक्रमाने महापालिकेकडे २७० कोटींची मागणी केली होती, त्यापैकी २६४ कोटी एनएमएमटीला अनुदान स्वरूपात प्राप्त झाले होते. यावर्षी वेतनवाढ आणि वाढता खर्च पाहता परिवहन विभागाने महापालिकेकडे ३१६ कोटींच्या भरघोस अनुदानाची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT