खारघर, ता. १६ (बातमीदार) : सेक्टर चारमधील उद्यानाची दयनीय अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लहान मुलांसाठी विरंगुळा आणि खेळाची सुरक्षित जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उद्यानात सध्या मोडकळीस आलेली खेळणी, गायब झालेली हिरवळ आणि जागोजागी पडून असलेले दगड यामुळे मुलांना खेळणे धोकादायक बनले आहे.
उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने उद्यानात खेळण्यासाठी मुलांची संख्या वाढली आहे. दरम्यान, खारघर सेक्टर चार भूखंड क्रमांक २२/२३ मधील भूखंडावर उभारण्यात आलेल्या उद्यानातील घसरगुंडी, झोपाळा यासारखे खेळणी तुटलेली आहेत. उद्यानात मोठ्या प्रमाणात दगड पडलेले आहेत. खेळताना मुलांचा तोल जाऊन दुखापत होण्याच्या घटना घडू शकतात. सेक्टर सातमधील उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या हायमास्टवरील काही दिवे बंद आहेत, तर सेक्टर चार भूखंड क्रमांक क्रमांक सहा उद्यानांतील बाकडे मोडकळीस आली आहेत. उद्यानात स्वच्छता केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
काही उद्याने चांगली आहेत. मात्र, काही उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानात गर्दुल्यांचा वावर असतो. खेळणी मोडकळीस आली आहेत. उद्यानात सुरक्षा रक्षक आणि माळी कामगार असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात कोणीही नसतो. यासंदर्भात आगामी महासभेत प्रश्न उपस्थित करणार आहे.
- लीना गरड, स्थानिक नगरसेविका
सेक्टर चार भूखंड क्रमांक २२/२३ मधील भूखंडावर उद्यान सिडकोने पालिकेकडे हस्तांतरण झाले नाही. तसेच सेक्टर सात आणि चारमधील काही बंद असलेले बंद पथदिवे सुरू करण्यात यावे, अशी सूचना विद्युत विभागाकडे केली आहे.
- नानासाहेब कामठे, उपायुक्त, पनवेल महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.