मुंबई

शनिवारी ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’

CD

खारघर, ता. १६ (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या वतीने शनिवारी (ता. १८) खारघरमधील सेंट्रल पार्क येथे ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन (प्रोमो रन)’चे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गरम्य खारघर हिलच्या सान्निध्यात होणाऱ्या या स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.

या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे खारघर हिल परिसरातील हिरवळ, डोंगररांग आणि ताज्या वातावरणात धावण्याचा अनोखा अनुभव. ‘प्रोमो रन’च्या माध्यमातून शहरातील फिटनेसप्रेमींना एकत्र आणणे, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि क्रीडा संस्कृतीला चालना देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा पाच किमी आणि दहा किमी अशा दोन गटांत होणार आहे. दहा किमी गटाची धाव स्पर्धा सकाळी ५.४५ वाजता, तर पाच किमी गटाची स्पर्धा सकाळी ७ वाजता सुरू होईल. पनवेल, तसेच नवी मुंबई परिसरातील नागरिक, व्यावसायिक धावपटू आणि क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. इच्छुकांनी https://forms.gle/Sk५YLFit२cvL९QD९९⁠ या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT