‘आंबेडकर चौकाचे रुंदीकरण करा’
वसई (बातमीदार) ः वसई पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मार्गावरील आंबेडकर चौक येथे रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक चंद्रशेखर धुरी यांनी केली आहे. अंबाडी रोड येथील डॉ. आंबेडकर चौकात वाहनांच्या रहदारीमुळे वाहतूक कोंडी होते. अनेकदा अत्यावश्यक सेवांना त्याचा फटका सहन करावा लागतो. रहदारीवेळी अडचणींचा सामना करावा लागत असतो, त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची मागणी चंद्रशेखर धुरी यांनी आयुक्तांकडे केली आहे.